कर्जत / प्रतिनिधी :
कर्जत तालुक्याचा विकास पुरूष तालुक्याचे भाग्य विधाते व सुसंस्कृत नेता राम शिंदे यांचा वाढदिवस कमीत कमी एक महिना साजरा होणार आहे असे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी कुभेफळ येथे पप्पूशेठ धोदाड मित्रमंडळ आयोजित
सांस्कृतिक कार्यक्रमात जाहीर केले.
आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त कुभेफळ येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, सोशल मीडिया अध्यक्ष गणेश पालवे, प्रशांत अडसूळ यांच्या सह कुभेफळ व परिसरातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना सचिन पोटरे म्हणाले की, कोरेगाव जि. प गटाचे भावी सदस्य पप्पूशेठ धोदाड यांनी गरीब व गरजू लोकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचार केले.आ.राम शिंदे यांच्या पराभवा च्या काळात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात राम शिंदे यांचे नाव व काम पोहोचवणे चे काम पप्पूशेठ धोदाड यांनी केले आहे. आ. राम शिंदे यांचा वाढदिवस कमीत कमी एक महिना साजरा होणार आहे. पहिला वाढदिवस साजरा करण्याचा मान पप्पूशेठ धोदाड यांना मिळाला आहे
यावेळी अॅड पलूसकर म्हणाले की,
आदर्श कसा घालता येईल याचे उदाहरण म्हणून पप्पूशेठ धोदाडयांना ओळखले जाईल खिशाकडे न पाहता काम केले येणाऱ्या काळात समाज भिमुख कार्य करावे व कोरेगाव गटातील लोक तुमचे नक्कीच हात बळकट करतील असा विश्वास व्यक्त केला.
पप्पूशेठ धोदाड यावेळी म्हणाले की, संवादाच्या जोरावर राम शिंदे यांनीअनेक पदे भूषविली नेता म्हणून काम चांगले करण्यासाठी सतत प्रयत्न चालू असतो. सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी सतत काम करणारा नेता म्हणून राम शिंदे यांच्या कडे पाहिले जाते.
Post a Comment
0 Comments